म्हाडातील घोटाळ्यांचा विषय सध्या चांगलाच गाजत आहे. अशातच म्हाडाचा नवीन घोटाळा समोर आला आहे. यात अधिकारी आणि दलालांच्या मदतीने एका महिलेने चक्क गरीबांच्या तीन-तीन घरांवर डल्ला मारला आहे. उघड झालेल्या या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नरसी नाथा स्ट्रीट या ठिकाणी असलेल्या इमारतीतून हा हा प्रकार उघडाकीस आला आहे. या ठिकाणची 192 ते 194 क्रमांकाची इमारत साध्या चर्चेत आहे. ग्राऊंड प्लस वन दिसत असलेल्या या इमारतीवर पूर्वी चार माजले होते. 28 खोल्या असलेल्या या इमारतीत फेरफार करून 31 खोल्या बनविण्यात आल्या आहे. याच इमारतीत तीन-तीन घर लाटणारी महिला राहत असून तिचे नाव आयशा अन्वर शेख आहे. भाडेकरूंच्या यादीत या महिलेचे नाव नाही.
मात्र अधिकारी आणि दलालांना हाताशी धरून बोगस कागादपत्रे सादर करत या महिलेने आपला नाव यादीत समाविष्ठ करून घेतले. याबाबत आधीक माहिती घेतली असता घर घेण्यासाठी आयशा हिने वरळी कोळीवाड्यातील पत्त्याचा आधार घेतला. मात्र तिचा हा पत्ता अस्तित्वात नसून बोगस पत्ता सादर करत तिने घर लाटल्याचे सामोर आले आहे.
या महिलेने अधिकारी आणि दलालांच्या मदतीने तीन घरांवर डल्ला मारला आहे. यातील पाहिलं घर करीरोड इथल्या सुखकर्ता सोसायटीत आहे. मार्च 2021 मध्ये 13 व्या मजल्यावर 1307 क्रमांकाचा फ्लॅट तिला देण्यात आला आहे. या ठिकाणी सध्या कुलूप आहे. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता. सुखकर्ता सोसायटीच्या बदल्यात दुसरीकडे फ्लॅट मिळावा यासाठी महिलेचा अर्ज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र पहिल्या फ्लॅटचा हक्क न सोडता दुसरा फ्लॅट देण्यात आला आहे. दुसरा फ्लॅट हा लक्षमी नारायण इमारातील 409 क्रमकांचा असून याठिकाणी या महिलेने सोसायटीकडे शेअर सर्टिफिकेटसाठी अर्ज देखील केला आहे. तर कुर्ल्याच्या स्वान मिल संक्रमण शिबीरत आयशाने गरिबांच्या हक्काच्या तिसऱ्या फ्लॅटवर डल्ला मारला आहे. अतिशय गंभीर अशा या प्रकारामुळे म्हाडातील घोटाळ्याची व्याप्ती लक्षात येते. आयशा हिने अधिकारी आणि दलांच्या मदतीने ही घरे लाटली आहे.