Wednesday, February 18, 2026
Homeकोल्हापूर'कोल्हापूर उत्तरसाठी २०२४ ला शिवसेनेच्या जागेबाबत पुन्हा चर्चा'

‘कोल्हापूर उत्तरसाठी २०२४ ला शिवसेनेच्या जागेबाबत पुन्हा चर्चा’

शिवसेनेने राबवलेल्या शिवसंपर्क अभियानानिमित्त संजय राऊत राज्याचा दौरा करत आहेत. या दरम्यान अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईवर त्यांनी भाष्य केले. याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे. ही जागा काँग्रेसला गेल्याने शिवसैनिक नाराज झाले यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुचक वक्तव्य केले आहे. नागपुरमध्ये संजय राऊत यांनी प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोल्हापूर उत्तर जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसैनिक नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीचा विचार करता ज्या जागा आमच्या पक्षाकडे नाही त्याठिकाणी संघटनात्मक बांधणी करून निवडणूक लढवण्याचा आमचा मानस आहे.

कोल्हापूरची जागा अनेक वर्ष शिवसेना लढत आहे आणि जिंकत आहे. परंतू २०१९ ला शिवसेना-भाजपा युती असताना शिवसेनेचे राजेश क्षिरसागर पराभूत झाले. काँग्रेसचा उमेदवार जिंकून आला. त्यामुळे पोटनिवडणुकीत ही जागा काँग्रेसला दिली आहे. २०२४ च्या निवडणुकीत या जागेबाबत पुन्हा चर्चा होईल असं सांगत सूचक विधान केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -