क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयपीएल (IPL 2022) काही दिवसात सुरू होणार आहे. या स्पर्धेचा काळ देशात एखाद्या मोठ्या इव्हेंटप्रमाणे असतो. IPL 2022 चे सामने 26 मार्चपासून सुरू होणार आहेत. आता हे सामने पाहण्यासाठी तुम्हाला टीव्ही समोर बसण्याची गरज नाही. तुम्ही जिथे असाल तिथून तुम्ही सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. IPL 2022 च्या प्रत्येक सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग हे मोबाईल ओटीटी अॅप Disney + Hotstar वर केले जाणार आहे.
IPL 2022 च्या प्रत्येक सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग हे मोबाईल ओटीटी अॅप Disney + Hotstar वर केले जाणार आहे. त्यामुळे तुम्ही Disney + Hotstar द्वारे तुमच्या फोनवर कधीही आणि कुठेही सामन्याचा (Live broadcast) आनंद घेऊ शकता. यासाठी तुम्ही Disney + Hotstar ला मोफत सबस्क्रिप्शन देणार्या प्लॅनने रिचार्ज करू शकता. आज आम्ही तुम्हाला Jio, Airtel आणि Vi च्या अशा काही प्लॅनची (Disney + Hotstar mobile Recharge) माहिती देत आहोत ज्याद्वारे तुम्हाला Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन मोफत मिळेल आणि इतरही अनेक फायदे मिळतील.
Airtel चे Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन प्लॅन
तुम्ही एअरटेचे ग्राहक असला तर तुम्हाला Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन तुमच्या रिचार्ज प्लॅनसोबत फ्री मिळू शकते. Airtel यूजर्स Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी 599 रुपायांचा रिचार्ज प्लॅन घेऊ शकतात. याची वैधता 28 दिवस आहे आणि यात दररोज 100 एसएमएस दिले जातात. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगही मिळते. यावशिवाय कंपनीचा 838 रुपयांचा प्लॅन देखील डिस्ने + हॉटस्टारच्या फ्री सबस्क्रिप्शनसह मिळतो आणि या प्लॅनची वैधता 56 दिवस आहे.
Vodafone Idea चे Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन प्लॅन
व्होडाफोन आणि आयडियाच्या यूजर्सना देखील मोबाईल रिचार्जसोबतच फ्री Disney+ Hotstar सब्सक्रिप्शन मिळते. Vodafone Idea कंपनी 601 रुपयांच्या प्लॅनसह यूजर्सना मोफत Disney + Hotstar सबस्क्रिप्शन आणि अमर्यादित कॉलिंग सुविधा देते. 28 दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा आणि 100 SMS देखील दिले जातात. या शिवाय कंपनीचा दुसरा प्लॅन 901 रुपयांचा आहे आणि त्याची वैधता 70 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन, 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग देखील दिले जात आहे.
Jio चे Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन प्लॅन
तुम्ही Reliance Jio यूजर्स असाल तर तुम्हाला असे अनेक प्लान्स मिळतील ज्यामध्ये Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. तुम्ही Jio चा 601 रुपयांचा प्लान खरेदी करू शकता. याची वैधता 28 दिवस आहे. या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटाही दिला जात आहे. याशिवाय 6GB अतिरिक्त डेटाही मिळेल आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. याशिवाय कंपनीचा दुसरा प्लॅन 499 रुपयांचा आहे. जो 28 दिवसांच्या वैधतेसह आणि Disney + Hotstar च्या फ्री सब्सक्रिप्शनसह येतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 2GB डेटा आणि 100 SMS देखील मिळतात.