पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. ही वाढ ८०-८० पैशांची झालेली आहे. मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर १११.६७ रुपये, तर डिझेल प्रति लिटर ९५.७४ रुपये इतके झाले आहे. मुंबईत ८५ पैशांची, कोलकात्यात ८३ पेशांची प्रतिलिटर वाढ झालेली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मंगळवारपासून वाढण्यास सुरूवात झाली आहे. ५ राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. याचवेळी रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढत होत्या. भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या जातील, असा कयास बांधला जात होता. त्याची प्रत्यक्ष प्रचिती सध्या दिसत आहे.
यापूर्वी पेट्रोल आणि डिझेल दरांमध्ये ४ नोव्हेंबरला वाढ झाली होती. यानंतर १३७ दिवसांनी म्हणजे २१ मार्च राेजी इंधन दरवाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती ४५ टक्के दरांपर्यंत वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.