Tuesday, July 29, 2025
HomeसांगलीMiraj : लग्नाचे आमिष दाखवून मिरजेत तरुणीवर बलात्कार

Miraj : लग्नाचे आमिष दाखवून मिरजेत तरुणीवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी यल्लाप्पा कोळी (वय 32, रा. ख्वॉजा वसाहत, मिरज) याच्याविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यल्लाप्पा कोळी याची तरुणीबरोबर अनेक वर्षांपासून ओळख होती. कोळी याने तिच्याशी प्रेम संबंध निर्माण करून लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला, अशी तक्रार आहे.

परंतु फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच तरुणीने पोलिसात कोळी याच्याविरुद्ध बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीची फिर्याद दिली आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -