Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक : आता विश्वास कुणावर ठेवयचा ? सावत्र वडिलांकडून16 वर्षीय मुलीवर...

धक्कादायक : आता विश्वास कुणावर ठेवयचा ? सावत्र वडिलांकडून16 वर्षीय मुलीवर बलात्कार

गेल्या काही दिवसात मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील दोन आठवड्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार , हल्ले झाल्याच्या पाचहून अधिक घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत आरोपीना अटकही केली आहे. अशातच सावत्र बापानेच 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीचे वडिलांचे निधन झाल्यनंतर आईने दुसरे लग्न केले. यानंतर सावत्र वडील मुलगी घरात एकटी असल्याचे बघत सावत्र बापाने तिच्यावर बलात्कार केला आहे. येरवडा परिसरात ही घटना घडली आहे . याप्रकरणी पीडित मुलीने पोलिसात दिली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस तपास करत आहेत.

पीडित मुलीच्या आईने पतीच्या निधनानंतर दुसरे लग्न केलं. लग्नानंतर पीडित मुलगी आपल्या आई व सावत्र वडिलांसोबत राहण्यास आली. त्यानंतर सावत्र वडिलांनी पिडित मुलगी घरी एकटी असल्याचे बघता तिच्यावर अत्याचार केला. एवढंच नव्हेतर वेळाेवेळी तिला सावत्र पित्याने तिच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने तिच्याशी जवळीक साधत तिचा लैंगिक छळ केला. मात्र, सततच्या वडीलांच्या त्रासाला कंटाळून मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर याबाबत पाेलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास येरवडा पाेलीस करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आराेपी सावत्र पिता हा मुळचा आसाम राज्यातील सलिचर येथील रहिवासी आहे. पुण्यातील येरवडा परिसरात ताे दुसऱ्या लग्नाची पत्नी व तिच्या मुलीसाेबत राहत हाेता. सन 2016 पासून पिडित मुलगी घरी एकटी असताना वेळाेवेळी तिला सावत्र पित्याने तिच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने तिच्याशी जवळीक साधत तिचा लैंगिक छळ केला. मात्र, सततच्या वडीलांच्या त्रासाला कंटाळून मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर याबाबत पाेलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -