वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा बॉलिवूड आणि देशाच्या राजकारणात कामय चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजेच कंगना रणौत. कॉन्ट्रोव्हर्शियल क्वीनचा आज (23 मार्च) वाढदिवस आहे. कंगना ही आपल्या वादग्रस्त वक्त्यव्यामुळे चर्चेत राहत असली तरी तिचा प्रवास संघर्षाने भरलेला आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं जाणून घेऊया कंगना रणौत हिच्याविषयी काही रंजक फॅक्ट्स….
अभिनेत्री कंगना रणौत हिचा जन्म 23 मार्च 1987 मध्ये हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्याजवळील सुरजपूर येथे झाला. आजही तिचा संपूर्ण परिवार याठिकाणी राहत असून कंगना नेहमी सुट्यामध्ये तिथे जात असते. कंगनाचे वडील अमरदीप रणौत हे उद्योगपती आहेत. तर आई शाळेत शिक्षिका आहे. कंगना हिला रंगोली नावाची मोठी बहीण असून तिच्यावर अॅसिड हल्ला झाला होता. दरम्यान, दुसरीही मुलगीच झाली म्हणून कंगनाच्या जन्माने तिचे पालक नाराज होते. परंतु याच कंगनाने आपल्या मेहनतीच्या बळावर यश साध्य करत पालकांची मान उंचाविली आहे.
कंगणा रणौत हिचे चित्रपटात काम करण्याचे सुरुवातीपासूनचे स्वप्न होते. परंतु तिने डॉक्टर व्हावे अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा होती. मात्र ती 12 वीत नापास झाली. त्यानंतर अभिनय क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न उराशी बाळगत ती परिवाराचा विरोध असताना देखील दिल्ली निघून गेली. याठिकाणी थिएटर डायरेक्टर अरविंद गौंड यांच्याकडून अभिनयाचे धडे घेत इंडिया हाबिटेड सेंटरचा भाग बनली. गिरीश कर्नाड यांचे ‘रक्त कल्याण’ हे तिचे पहिले नाटक.
त्यानंतर 2005 मध्ये दिग्दर्शक अनुराग बासू यांनी कंगना हिला एका कॉफी शॉपमध्ये कॉफी पितांना स्पॉट करत चित्रपटाची ऑफर दिली. त्यानंतर 2006 मध्ये ‘गँगस्टर’ चित्रपटातून डेब्यू करत कंगनाच्या करिअरला सुरुवात झाली. या चित्रपटासाठी तिला ‘बेस्ट डेब्यू ऐक्ट्रेस’चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.