Saturday, March 15, 2025
Homeतंत्रज्ञानतुमच्याकडून चुकून व्हॉट्सॲप चॅट डिलीट झाली आहे का? मग काळजी नका करू...

तुमच्याकडून चुकून व्हॉट्सॲप चॅट डिलीट झाली आहे का? मग काळजी नका करू ‘या’ टिप्स फॉलो करून करा रिकव्हर

इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप देशात सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे. ऑफिशियल कामांसाठी देखील व्हॉट्सॲप  वापरले जाते. व्हॉट्सॲपवर असे काही फीचर्स आहेत जे युजर्सला चॅटिंगचा खास अनुभव देतात. हा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी व्हॉट्सॲपकडून नेहमीच अपडेट फीचर्स आणले जातात. असे हे व्हॉट्सॲप वापरत असताना अनेकदा बऱ्याच जणांकडून चुकून व्हॉट्सॲप चॅट डिलीट होते.

तुमच्याकडून देखील असं होत असेल तर काळजी करू नका ! डिलीट झालेले चॅट आता रिकव्हर करू शकतात. यासाठी तुम्हाला काही साध्या टिप्स  सांगणार आहोत. ज्या फॉलो केल्याने तुम्ही सहज चॅट रिकव्हर करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया काय आहे त्या टिप्स.

असे करा चॅट रिकव्हर
– तुम्ही जर व्हॉट्सॲप अकाऊंट इतर दुसऱ्या डिव्हाइसवर वापरत असाल तर सर्वात आधी गुगल अकाउंट लॉगइन करा.
– त्यानंतर व्हॉट्सॲप अकाउंट लॉगइन करत तुमचा 10 अंकी मोबाईल क्रमांक टाका.
– त्यानंतर व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करा. त्यानंतर गुगल ड्राइव्हवर जात तुम्ही तुमच्या चॅट हिस्ट्रीचा बॅकअप घेऊ शकतात.
– या ठिकाणी देण्यात आलेल्या रिस्टोर विकल्पवर क्लिक करत तुम्ही चॅट बॅकअप मिळवून घ्या.
– यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये स्टेबल वायफाय असले पाहिजे.
– यासह कायम व्हॉट्सॲप बॅकअप ऑप्शन सुरु ठेवा. यासाठी whatsapp -setting-chats-chats backup-back up to Google Drive वर जावे.

ही आहे दुसरी प्रोसेस
जर तुम्हाला जुन्या फोनमध्येच चॅट बॅकअप हवे असल्यास यासाठी लोकल स्टोरेजचा वापर करू शकतात.
– यासाठी सर्वात आधी फोनमध्ये फाईल मॅनेजर ओपन करा.
– त्यानंतर तिथे देण्यात आलेल्या इंटरनल स्टोरेजवर दिलेल्या व्हॉट्सॲप फोल्डरवर जा.
– आता डेटा बेस फोल्डरवर क्लिक करा. याठिकाणी तुम्हाला सर्व व्हॉट्सॲप चॅट मिळेल.
– यामध्ये कोण्या एकाचे नाव सिलेक्ट करा. म्हणजे त्या फाईलची नाव बदला.
– त्यानंतर तुमच्या फोनमधून व्हॉट्सॲप Uninstall करा आणि पुन्हा लॉगइन करा.
या पद्धतीने तुम्ही सहज डिलीट झालेले चॅट रिकव्हर करू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -