ताजी बातमी ऑनलाइन टीम
आजकाल लाखो लोक गुगल पेमेंट ॲप (Google Pay) वापरत आहेत. या ॲपमुळे एका सेकंदात तुम्ही समोरच्या व्यक्तीला पेमेंट करून व्यवहार पुर्ण करू शकता. व्यवहार करण्याचा हा एक अतिशय सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. मात्र, अनेक वेळा लोकांना Google Pay करताना अडचणींचा सामना करावा लागतो. काहीवेळा मध्येच पैसे अडकल्याने व्यवहार पूर्ण होत नाही. अशावेळी काय करावे हे लोकांना समजत नाही. तर यासाठी Google Pay करताना काही सोप्या टिप्स जाणून घ्या…
गुगल पेमेंट करताना वारंवार तुम्हचे ॲप अटकत असेल किंवा समोरच्या व्यक्तीशी व्यवहार करताना अढथळा निर्माण होत असेल तर तुम्ही हे ॲप वापरताना काळजी घेण्याची गरज आहे. यामुळे Google Pay करताना कमी नेटवर्क, सुरक्षित क्रमांकावर पेमेंट करणे आणि रक्कम भरल्यानंतर प्रतीक्षा करणे या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. तरच व्यवहार पूर्ण होवू शकतो.
कमी नेटवर्क असेल तर Google Pay करू नका
ज्या भागात तुम्ही राहात असाल किंवा जेथे तुम्ही तुम्ही व्यवहार करणार आहात तेथे पहिल्यांदा नेटवर्क किती आहे हे पाहावे. कारण नेटवर्क नसेल तर गुगल पे करताना पैसे अडकू शकतात. त्यामुळे पहिल्यांदा नेटवर्क आहे की नाही यांची खात्री कतरूनच पेमेंट करावे. यामुळे तुम्हचे पैसे चुकीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
सुरक्षित क्रमांकावर पेमेंट करा
जर तुम्ही डायरेक्ट नंबरद्वारे Google पेमेंट करत असाल, तर सुरक्षित क्रमांक निवडा. जर सुरक्षित क्रमांक सोडून चुकीच्या नंबर सेव्ह केल्यास पैसे अडकू शकतात. यामुळे गुगल पे योग्य होण्यास सुरक्षित क्रमांकच निवडा.
रक्कम भरल्यानंतर प्रतीक्षा करा
गुगल पे करताना अनेक वेळा लोक रक्कम भरल्यानंतर लगेच पेमेंट बटणावर क्लिक करतात. परंतु, तुम्ही असे करू नका. कारण पेमेंटचा उल्लेख केल्यानंतर तुम्ही एक ते दोन सेकंद थांबा आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करा. तपशील दिसल्यानंतर पेमेंट पर्यायावर क्लिक करा यामुळे पेमेंट अडकण्याची शक्यता फार कमी असते. या सर्व प्रयायाचा कोटेकोरपणे पालन केल्यास Google Pay ने व्यवहार करण्यास कोणताच अडथळा येत नाही.