मिरज – बेळगाव रेल्वेमार्गावरील बेळगाव गेट झोपडपट्टी हटविण्याच्या विरोधात दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. झोपडपट्टी हटविल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे : या झोपडपट्टीमध्ये 40 ते 50 वर्षांपासून नागरिक राहत आहेत. त्यांच्याकडून घरपट्टी, वीज बिल आणि पाणी बिल आकारण्यात येत आहे. परंतु आता रेल्वेकडून झोपडपट्टी हटविण्याबाबत नोटीस बजाविण्यात आली आहे. अन्यथा पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्याचा इशारा रेल्वेकडून देण्यात आला आहे. महासंघाचे उत्तम मोहिते, कार्यकर्ते, झोपडपट्टीधारक मोर्चात सहभागी झाले होते.