ताजी बातमी ऑनलाईन टीम
रिक्षा व्यवस्थित चालविण्यास सांगितल्याच्या रागातून महिला पोलिसासोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी महिला पोलिसाला रिक्षात ओढून त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार (Pune Crime) मोशी येथील भारतमाता चौक येथे मंगळवारी (दि. 22) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडला.
विश्वदीप भरत मादलापुरे अभिषेक बाळासाहेब पोळ
सुनिल शिवाजी कसबे Sunil Shivaji Kasbe (वय-20 तिघे रा. बनकर वस्ती, मोशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत महिला पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी (दि.23) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या ताब्यातील रिक्षा वेडीवाकडी आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा रीतीने चालवली. त्यावेळी फिर्यादी पोलीस कर्मचाऱ्याने आरोपींना रिक्षा व्यवस्थित चालवण्यास सांगितले. आरोपी पोलिसांचे न ऐकताच पुढे निघून गेले.
त्यानंतर भारत माता चौकात सिग्नलवर रिक्षा थांबवली असता फिर्यादी महिला पोलीस कर्मचारी त्याठिकाणी पोहचल्या. मी पोलीस आहे, रिक्षा व्यवस्थित चालवा असे सांगितले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांच्या सोबत गैरवर्तन करुन फिर्यादी यांचा विनयभंग केला. तसेच फिर्यादी यांना रिक्षात ओढून रिक्षा तशीच पुढे पळवून नेली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. सरकारी कामात अडथळा आणून विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण (PSI Chavan) करीत आहेत.