ताजी बातमी ऑनलाइन टीम
आयपीएल स्पर्धेला (IPL 2022) सुरुवात होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहे. त्यापूर्वीच क्रिकेटप्रेमींसाठी (Cricket Lovers) आणि महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने सीएसके (CSK) म्हणजेच चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) कॅप्टन पद सोडले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना आणि क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. महेंद्रसिंग धोनीने सीएसकेचे कॅप्टनपद भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाकडे (Ravindra Jadeja) सोपवले आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएल 2022 मध्ये सीएसके टीमचे कॅप्टन पद रवींद्र जडेजा सांभाळणार आहे.
कॅप्टन कूल’ म्हणून ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीने याआधीच आयपीएल वगळता इतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याच्या या निर्णयामुळे क्रिकेटप्रेमींना धक्का बसला होता. या धक्क्यातून ते सावरत नाही तोवरच धोनीने आणखी एक मोठा निर्णय घेत चाहत्यांना पुन्हा मोठा धक्का दिला. आयपीएल सुरु होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच महेंद्रसिंग धोनीने सीएसकेचे कॅप्टनपद सोडल्याचे जाहीर केले आहे. त्याच्या या निर्णयामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण आहे. महत्वाचे म्हणजे त्याने सीएसकेच्या कॅप्टन पदाची जबाबदारी रवींद्र जाडेजाकडे सोपवली आहे. यासंदर्भात सीएसकेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्वीट करत ही माहिती दिली आहे.