Monday, December 23, 2024
Homeसांगलीसांगली: विवाहितेचा पैशांसाठी छळ, संशयिताविरोधात गुन्हा दाखल

सांगली: विवाहितेचा पैशांसाठी छळ, संशयिताविरोधात गुन्हा दाखल

माहेरहून व्यवसायासाठी दोन लाख रुपये घेऊन येण्यासाठी सासरी छळ झाल्याची तक्रार महिलेने संजयनगर पोलिस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी पती रमजान हसन जमादार, सासू श्रीमती हसिना हसन जमादार, नणंद सबिया हसन जमादार आणि सलमा (रा. हडको कॉलनी, मिरज) अशी या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले, या महिलेचा रमजान याच्याबरोबर सप्टेंबर 2013 मध्ये विवाह झाला होता. तेव्हापासून संशयितांनी ‘तुला स्वयंपाक येत नाही, तू आमच्या मुलाला शोभत नाहीस’, असे म्हणून छळ सुरू केला. घर घेण्यासाठी तीन लाख रुपये घेऊन ये, यासाठीही त्रास दिला. त्यानंतर विवाहितेच्या आईने तीन लाख रुपये दिले. त्यानंतर पुन्हा पतीने ‘व्यवसाय करण्याकरता दोन लाख रुपये घेऊन ये, नाहीतर तुला नांदू देणार नाही’, असे म्हणून मानसिक, शारीरिक त्रास देऊन वेळोवेळी उपाशीपोटी ठेवले. मारहाण केली, याबाबत तक्रार दिल्यानंतर संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -