सततच्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे अक्षरश: कंबरडं मोडलं आहे. सतत या नाही तर त्या वस्तूंच्या किमती वाढत आहे. महागाई थांबायचे नाव घेत नाहीये. या महिनाभरामध्ये दूध, गॅस सिलेंडर (Gas Cylinder Price Hike), पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price Hike) यांचे दर वाढले. त्यामुळे सर्वसामान्य जनता चिंतेत आली आहे. ही दरवाढ होत नाही तोवर आता सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसणार आहे. आता औषधांच्या किमती (Medicine Price) देखील वाढणार आहेत. त्यामुळे येत्या काही काळात सर्वसामान्यांना जगणं मुश्किल होणार आहे.
पेन किलर, अँटीबायोटिक्स , अँटी-व्हायरससह अनेक अत्यावश्यक औषधांच्या किमती 1 एप्रिलपासून वाढणार आहेत. सरकारने शेड्यूल्ड औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता औषधांच्या किमतीत देखील वाढ होणार आहे. याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. कारण आजारी पडल्यानंतर बरं होण्यासाठी लागणारी औषधं महागणार असल्यामुळे त्याचा थेट परिणाम घराच्या बजेटवर होणार आहे.
भारताच्या औषध किंमत प्राधिकरणाने शुक्रवारी औषधांच्या किमतींमध्ये 10.7 टक्के वाढ करण्याची परवानगी दिली. जी किंमत नियंत्रणात आहे. ही परवानगी दिलेली सर्वोच्च दरवाढ आहे. नॅशनल लिस्ट ऑफ एसेंसियल मेडिसिनच्या (NLIM) अंतर्गत एप्रिलपासून 800 हून अधिक औषधांच्या किमती वाढणार आहेत. या औधषांच्या किमती दोन टक्क्यांनी वाढू शकतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 23 मार्च रोजी, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने (NPPA) भारतातील औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवणारी सरकारी नियामक संस्था, कंपन्यांना घाऊक किंमत निर्देशांकवर (WPI) आधारित किंमती वाढवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. होते. त्यानंतर 1 एप्रिलपासून सर्व जीवनावश्यक औषधांच्या किमती सुमारे 2 टक्क्यांनी वाढू शकतात, असे सांगण्यात आले.