Homeमहाराष्ट्रNEET UG Counselling 2026 चे वेळापत्रक जाहीर, या तारखेपासून सुरु होणार रजिस्ट्रेशन

NEET UG Counselling 2026 चे वेळापत्रक जाहीर, या तारखेपासून सुरु होणार रजिस्ट्रेशन

मेडिकल काऊन्सिलिंग कमिटीने ( Medical Counselling Committee) नीट युजी 2026 काऊन्सिलिंगचे वेळापत्रक जारी केले आहे. एमसीसीच्या वतीने जारी केलेल्या या कार्यक्रमानुसार पहिला फेरीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन 5 ऑगस्ट 2026 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटचा तारीक 12 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे.ही काऊन्सिलिंग 15 टक्के ऑल इंडिया कोटा आणि एमसीसीच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या दुसऱ्या जागांवर एमबीबीएस, बीडीएस आणि बीएससी नर्सिंग कोर्समध्ये प्रवेशासाठी आयोजित करण्यात आली आहे.

 

नीट युजी 2026 ची 3 मे रोजी झालेली मूळ परीक्षा पेपर फुटी झाल्यानंतर रद्द करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या 21 जून 2026 रोजी ही फेर परीक्षा घेण्यात आली होती. या फेरपरीक्षेनंतर, 16 जुलै 2026 रोजी NEET UG 2026 चे निकाल जाहीर करण्यात आले होते. यात एकूण 11.21 लाख उमेदवार पात्र ठरले असून, ऑगस्ट 2026 साठी समुपदेशनाची (counseling) तयारी सुरू असतानाच आता काऊन्सिंगचे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे.

 

Neet paper leaks झाल्यानंतर देशभरातील २२ लाख विद्यार्थ्यांना नाहक मन:स्ताप भोगावा लागला आहे. देशातील २२ विद्यार्थ्यांना नीट परीक्षा पुन्हा देण्याच्या ताणतणावातून आत्महत्या केलेल्या आहेत. या संदर्भात सुरुवातीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना राजस्थानातून या प्रकरणी विद्यार्थ्यांचे मेळावे घेत वातावरण तापवायला सुरुवात केली होती.त्यानंतर अचानक सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सुर्य कांत यांनी तरुणांवर केलेल्या एका ( झुरळ ) मार्मिक टिप्पणीवरुन परदेशात असलेल्या अभिजीत दीपके या तरुणाने सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी हा प्लॅटफॉर्म तयार केला. आणि त्यानंतर नीट परीक्षा फुटीचा मुद्दा दीपके यांनी हाती घेतला.

 

सर्वाधिक आरोपी महाराष्ट्रातील

दिल्लीच्या जंतरमंतरवर आधी पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांनी प्रदीर्घ उपोषण केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना उचलून दवाखान्यात भरती केले. तरीही २० जुलै रोजीचा संसदेवरील मोर्चा दीपके यांनी काढला. त्यावर लाठीमार झाल्यानंतर हे आंदोलन आणखीनचे चिघळले. नीट पेपर फुटीत आतापर्यंत डझनावारी आरोपींना सीबीआयने अटक केली असून सर्वाधिक ८ आरोपी हे महाराष्ट्रातील आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -