Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगAmravati Accident: लग्न ठरवायला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ट्रक-कार अपघातामध्ये पाच जण...

Amravati Accident: लग्न ठरवायला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ट्रक-कार अपघातामध्ये पाच जण ठार!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

अमरावतीमध्ये रविवारी भीषण (Amravati Accident) अपघाताची घटना समोर आली आहे. अमरावती (amravati) शहरातील रहाटगाव रिंगरोडवर ट्रक आणि तवेरा कारमध्ये भीषण अपघात (Truck- Car Accident) झाला. या अपघातामध्ये 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ओव्हरटेकच्या (Overtake) नादामध्ये हा अपघात झाला आहे. अमरावतीवरुन नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला अमरावतीवरुन वलगावकडे जाणाऱ्या तवेरा कारने जोरदार धडक दिली. अमरावती शहरातील रहाटगाव रिंगरोडवर तवेरा गाडीने ट्रकला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये तवेरा गाडीचा चक्काचूर झाला आहे. अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव बारी येथे राहणारे काही जण तवेरा गाडीने वलगाव येथे साक्षगंध सोहळ्यासाठी जाताना हा अपघात झाला. अपघातील सर्व मृत आणि जखमी व्यक्ती हे तवेरा गाडीमधील आहेत.


अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Amravati Police) घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने जखमींना नजीक शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघातामध्ये तवेराच कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातामध्ये जखमी झालेल्या पाच जणांवर अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातातील मृतांमध्ये कार चालकाचा देखील समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -