Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगमूल चोरल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या, मुख्य आरोपीला अटक

मूल चोरल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या, मुख्य आरोपीला अटक

ताजी बातमी ऑनलाइन टीम

नोएडा : कथित मूल चोरल्याप्रकरणी एका तरुणा (Youth)ला झाडाला बांधून चोप देत हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नोएडामधील दनकौर परिसरात एका गावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. ननकू असे हत्या करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा नेपाळचा रहिवासी आहे. याप्रकरणी पीडित तरुणाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे


नोएडा : कथित मूल चोरल्याप्रकरणी एका तरुणा (Youth)ला झाडाला बांधून चोप देत त्याची हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना नोएडामधील दनकौर परिसरात एका गावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. ननकू असे हत्या करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा नेपाळचा रहिवासी आहे. याप्रकरणी पीडित तरुणाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे


बीडमध्ये दोन तरुणांवर टोळक्याचा हल्ला
भररस्त्यात दोन तरुणांवर 20 ते 25 जणांच्या टोळक्याने काठी आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना शनिवारी बीड शहरात घडली. बीड शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या सम्राट चौकामध्ये ही घटना घडली आहे. रस्त्यावर मारहाण करतानाचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.दरम्यान यात दोन तरुण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर मारेकरी घटनस्थळावरून फरार झाले आहेत. गजबजलेल्या ठिकाणी हाणामारी झाल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -