ताजी बातमी ऑनलाइन टीम
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. रशिया आणि युक्रेमध्ये सुरू असलेले युद्ध आणि कच्च्या तेलाच्या दरात (Crude oil price) आलेली तेजी यामुळे पुढील आठवड्यात देखील शेअर मार्केमध्ये चढ उतार कायम राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शेअर बाजारात विश्लेषकांनुसार रशिया युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम हा जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. खाद्यतेलापासून ते कच्च्या तेलापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेअर बाजारावरील दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना (Stika Investmart Ltd) चे संशोधन प्रमुख संतोष मीणा यांनी म्हटले आहे की, सध्या जागतिक बजारात काही अंशी स्थिरता दिसून येत आहे. मात्र तरी देखील युद्धामुळे अनिश्चिता कायम राहील.
कच्च्या तेलाच्या दरामध्ये तेजी
पुढे बोलताना संतोष मीणा यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने कमी जास्त होत आहेत. त्याचा फटका अनेक कंपन्यांना बसला आहे. कच्च्या तेलाच्या दरांमध्ये आलेली तेजी ही भारतीय शेअर बाजाराच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. दुसरीकडे आपल्याला शेअर मार्केटमध्ये सहभागी असलेल्या वाहन कंपन्यांच्या विक्रीवर देखील लक्ष ठेवावे लागणार आहे. येत्या काळात वाहन विक्री घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ऑटो सेक्टरवर नकारात्मक परिमाण होई शकतो.
रुपयामध्ये अस्थिरता
भारतीय चलन असलेल्या रुपयांच्या मुल्यात देखील अस्थिरता दिसून येत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य कमी-अधिक होत आहे. याचा देखील शेअर मार्केटवर परिणाम दिसून येत आहे. सध्या तर गुंतवणूकदारांचा शेअरमधील गुंतवणूक मोकळी करण्याकडे कल असल्याने येणाऱ्या काळात शेअर मार्केट आणखी कोसळू शकते असं देखील काही तज्ज्ञांनी म्हटले आहे.




