वाहनधारकांसाठी एक मोठी बातमी आहे. मोदी सरकारने वाहन मालकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, आगामी काळात रस्त्यावरील सगळी टोलनाके हटवले जाणार आहेत.. मात्र, महामार्गावरील टोलनाके हटवले जाणार असले, तरी तुमचा खिशा मात्र कापला जाणार आहेच..! ते नेमकं कसं, हे समजून घेऊ..
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत संसदेत माहिती दिली. ते म्हणाले, की “आगामी काळात रस्त्यावरील सर्व टोल प्लाझा हटवले जातील, म्हणजेच रस्त्यावर कोणतीही टोल लेन नसेल. टोल वसूलीसाठी ‘जीपीएस’ (GPS) आधारित ‘ट्रॅकिंग सिस्टीम’ तयार केली जात आहे.”
“या प्रणालीमुळे वाहनधारकांना टोलनाक्यावर थांबण्याची गरज नाही. टोल नाका गाडीने पार केला, की वाहनमालकाच्या बँक खात्यातून टोलची रक्कम आपोआप कापली जाईल.याबाबत सरकार लवकरच एक धोरण आणणार आहे.”
60 किलोमीटरवर एक टोल
“टोलनाक्यावर नागरिकांचा वाया जाणारा वेळ वाचण्यासाठी टोल लेन रद्द केली जाणार आहे. त्याऐवजी राष्ट्रीय महामार्गावर दर 60 किलोमीटरवर एक टोल प्लाझा असेल. या अंतराच्या मध्ये येणारे सर्व टोल पुढील तीन महिन्यांत हटवले जातील. टोलनाके हटवले जाणार असल्याने प्रवाशांना टोल भरण्यासाठी कुठेही थांबावं लागणार नाही,” असे गडकरी म्हणाले.
“‘जीपीएस’ प्रणालीद्वारे वाहनमालकाच्या बँक खात्यातून थेट पैसे कट केले जातील. त्यामुळे जितक्या रोडचा वापर केला असेल, तेवढाच टोल कापला जाणार आहे. त्यामुळे वाहनमालकांचाही मोठा फायदा होईल,” असे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी स्पष्ट केले..