Tuesday, December 24, 2024
Homeब्रेकिंगमुलांनो… यंदा मामाच्या गावाला उशिरा जायचं! शाळांच्या एप्रिलमधील उन्हाळी सुट्ट्या रद्द, फक्त...

मुलांनो… यंदा मामाच्या गावाला उशिरा जायचं! शाळांच्या एप्रिलमधील उन्हाळी सुट्ट्या रद्द, फक्त अभ्यास!

ताजी बातमी ऑनलाईन टीम


विद्यार्थी आणि पालकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. कोरोना काळात (Corona) मागील दोन वर्षात अधिकाधिक काळ शाळा बंदच होत्या. . हे नुकसान भरुन काढण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं एक मोठा निर्णय घेतलाय. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांची यंदाची उन्हाळी सुट्र द्द करण्यात आलीय. एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यंदा उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेता येणार नाही.


उन्हाळी सुट्टीतही अभ्यास
कोरोना संसर्गामुळे मागील दोन वर्षाच्या काळात अवघे काही दिवस शाळा सुरु राहिल्या. पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला. मात्र, त्यालाही अनेक मर्यादा असल्याचं वेळोवेळी पाहायला मिळालं. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. तसंच विद्यार्थ्यांचंही मोठं शैक्षणिक नुकसान झालं आहे. अशावेळी शाळा पुन्हा सुरु करण्याची मागणी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून केली जात होती. त्यानुसार शाळा सुरु करण्यात आल्या. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांचा कस लागत असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे एप्रिल महिन्यात शाळा पूर्णवेळ सुरु ठेवून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता एप्रिल महिन्यातील उन्हाळी सुट्टी रद्द करण्यात आलीय. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता उन्हाळी सुट्ट्यांमध्येही अभ्यास करावा लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -