Saturday, July 26, 2025
Homeब्रेकिंगकोल्हापूर : अडकूरमध्ये पट्टेरी वाघ

कोल्हापूर : अडकूरमध्ये पट्टेरी वाघ

ताजी बातमी ऑनलाईन टीम

अडकूर येथील निकम-रेंगडेंच्या शेतात सोमवारी (दि. 28) सायंकाळी 7 च्या सुमारास पट्टेरी वाघ दिसल्याने सर्वांची भंबेरी उडाली. शेतीची कामे आटोपून घरी परतणार्‍या शेतकर्‍यांसह एका शिक्षकालाही हा वाघ दिसला.


अडकूर येथील शिक्षक राजू चौगुले हे इब्राहिमपूरहून आपल्या दुचाकीवरून अडकूरला घरी येत होते. तेव्हा त्यांना एका शेतात पट्टेरी वाघ दिसला. त्यांनी या वाघाला मोबाईल कॅमेर्‍यात सहज कैद केले. अडकूरला पट्टेरी वाघ आल्याची बातमी काही क्षणात सर्वत्र पसरली आणि निकम-रेंगडेंच्या शेताकडे अनेकजण धावत गेले. मात्र, कुणालाही वाघाचे दर्शन झाले नाही. गडहिंग्लज बाजार कृषी समितीचे अध्यक्ष अभय देसाई यांनी वन विभागाला याची माहिती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -