Wednesday, July 30, 2025
Homeमहाराष्ट्रसाठ एकर ऊस जळून खाक

साठ एकर ऊस जळून खाक

सातारा तालुक्यातील गोजेगाव येथील धारकारा, मोडा, देशमुख शिवारातील सुमारे साठ एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये सुमारे शंभरहून अधिक शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा शेतकर्‍यांनी आरोप करुन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

मिरजेत युवकाची गळफास घेवून आत्महत्या

गोजेगाव परिसरात उसाची लागण मोठ्या प्रमाणावर आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गोजेगाव येथील कृष्णा नदीच्या पूर्वेकडून अचानक आगीचा लोट आला वार्‍यामुळे ही आग मोडा, देशमुख व धारकारा या नावाने ओळखल्या जाणार्‍या शिवारातील ऊसाला लागली.

वार्‍यामुळे आगीच्या झळा एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत्या की, क्षणार्धात सुमारे पन्नास ते साठ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. तर देशमुख शिवारातील हरभरा-गव्हाच्या पिकालाही आगीची झळ बसली. यामध्ये या परिसरातील सुमारे शंभरहून अधिक शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -