Friday, November 14, 2025
Homeब्रेकिंगड्युटीवरुन परतताना बाईक कारवर धडकली,  वन विभागाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

ड्युटीवरुन परतताना बाईक कारवर धडकली,  वन विभागाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

वन विभागाच्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कर्तव्यावरुन परत येत असताना त्यांना अपघात झाला होता. वर्धा जिल्ह्यात (Wardha) ही धक्कादायक घटना घडली. दुचाकीची चारचाकी वाहनाला धडक बसून अपघात झाल्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्याला (Forest Department) प्राण गमवावे लागले. संजय शंकरराव पोलार (वय 49 वर्ष, रा. नाचणगाव) असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. हा अपघात बोथली गावाजवळ घडला.

Stock Market : उघडताच बाजार घसरला,सेन्सेक्स पुन्हा 58 हजारांच्या पुढे

संजय शंकरराव पोलार हे पहिले सैन्य दलात कार्यरत होते. तिथून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी वन विभागातील नोकरी स्वीकारली. पानेवाडी परिसरात त्यांची नोकरी असल्याने दररोज दुचाकीने ये-जा करत होते.

कर्तव्यावरून परतत असताना बोथली गावाजवळ उभ्या कारला दुचाकीची धडक बसल्याने संजय यांचा अपघात झाला. डोक्याला दुखापत झाल्याने पुलगावच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांना आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संजय पोलार यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -