Tuesday, July 29, 2025
Homeसांगलीमिरजेत युवकाची गळफास घेवून आत्महत्या

मिरजेत युवकाची गळफास घेवून आत्महत्या

मिरज / प्रतिनिधी
मिरज येथील धनगर गल्लीत राहणाऱ्या व खासगी फायनान्स कंपनीत वसुली प्रतिनिधी म्हणून काम करीत असलेल्या आकाश शिवाप्पा बंडगर (वय २६) या युवकाने आपल्या राहत्याघरी गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची नोंद मिरज शहर पोलिसात झाली आहे.अधिक माहिती अशी की, आकाश बंडगर हा नेहमी प्रमाणे रात्री झोपण्यासाठी गेला. सकाळी लवकर उठणारा आकाश हा दिसला नाही. म्हणून त्याचा चुलतभाऊ ओंकार रामचंद्र बंडगर आकाशला उठविण्यासाठी गेला असता त्यास आकाश याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -