Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रकैदीही होणार आत्मनिर्भर!  शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना मिळणार 50 हजारापर्यंत कर्ज

कैदीही होणार आत्मनिर्भर!  शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना मिळणार 50 हजारापर्यंत कर्ज

राज्यातील वेगवेगळया कारागृहात ( prison)शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या सुधारणेसाठी कारागृह प्रशासन कायम प्रयत्न करत असते. याबरोबरच आता कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदिवानांना 50  हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीरकेले आहे.राज्य सहकारी बँकेतून 50 हजार रुपयापर्यंतचे कर्ज 7 टक्के व्याजदराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात पुण्यातील येरवडा कारागृहातून केली जाणारा आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राबवला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी. कैदयांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने कर्जरूपाने रक्कम दिली जाणार आहे. हे कर्ज घेता असताना कैद्याला जामीनदार देण्याची आवश्यकता नसणार आहे. शिक्षा भोगत असताना त्यांनी केलेल्या प्रामाणिक काम, त्यांना कारागृहात मिळणारे बंदीवेतन लक्षात घेत वैयक्तिक हमीवर हे कर्ज दिले जाणार आहे. देशातील हा पहिलाच उपक्रम असून 1055 कैद्यानावरील निकषांच्या आधारे हे कर्ज दिले जाणार आहे.

कारागृहात शिक्षा भोगतअसलेल्या कैद्यांपैकी अनेक कैदी हे त्यांच्या कुटुंबातील कमावते असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळ त्यांच्या त्यांच्या कौटुंबावर गंभीर परिणाम होतो. याबरोबरच त्यांची आर्थिक स्थितीही खालावते. यातूनच कुटुंबीय नैराश्याच्या गर्तेत जातात. त्यांच्या मनातही अपराधीपणाची भावना निर्माण होते. यासगळ्यातून ते कुटूंब बाहेर यावे. त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी , या कर्जाऊ रूपाने मिळणाऱ्या पैश्याच्या रूपाने त्यांचा विकास व्हावा या विचारातून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -