शिक्षकाला ग्रामस्थांनी चोप दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातीलच लहान मुलीचा शिक्षकाने विनयभंग केल्याचा आरोप केला जात आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात ही घटना घडल्याची माहिती आहे. शिक्षकाने केलेल्या कृत्याची माहिती मुलीने आपल्या आई-वडिलांना दिली, त्यानंतर हा प्रकार घडला. शिक्षकाला ग्रामस्थांनी चोप दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामध्ये अनेक जण शिक्षकाला अक्षरशः लाथा-बुक्क्यांनी तुडवताना दिसत आहेत. तर एक महिला दप्तराने त्याला मारहाण करताना पाहायला मिळत आहे. संबंधित शिक्षकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल नसल्याची माहिती आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षकाला ग्रामस्थांनी चोप दिल्याची घटना समोर आली आहे. गावातच राहणाऱ्या लहान मुलीचा विनयभंग शिक्षकाने केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
ग्रामस्थांनी शिक्षकाला चोप देत असतानाचा व्हिडीओ शूट करण्यात आला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अनेक जण शिक्षकाला अक्षरशः लाथा-बुक्क्यांनी हाणत असल्याचं दिसत आहे. वर्गातच त्याला पायाखाली तुडवलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, संबंधित शिक्षकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार नसल्याची माहिती आहे. मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.