औरंगाबादमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, औरंगाबादमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यात तब्बल ३७ तलवारी आणि एका कुकरीचा समावेश आहे.
धक्कादायक म्हणजे कुरिअरच्या माध्यमातून हा शस्त्रसाठा मागवण्यात आला होता. औरंगाबादच्या क्रांती चौकात पोलिसांनी ही कारवाई केलीये.. कुरियर कंपनीच्या माध्यमातून ही हत्यारं शहरात आली.
पंजाब जालंधरमधून ही हत्यारं आल्याची माहिती आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तलवार साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा शस्त्रसाठा नेमका कोणी मागवलेला, यामागे घातपाताचा कट आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत.