आळते (ता. हातकणंगले) येथील भरचौकातील दोन बंद घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी एका घरातील रोख २५ हजारांसह सोन्या-चांदीचे दागिने असा ७५ हजारांचा ऐवज लंपास केला. या घरफोडीची नोंद हातकणंगले पोलिसांत झाली आहे. आळते येथे भरचौकात शीला नेमिनाथ संकाण्णा यांचे घर आहे. दोन दिवसांपूर्वी त्या शिरढोणला नातेवाइकांच्या वास्तुशांतीसाठी गेल्या होत्या. मंगळवारी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी बंद घराचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. तिजोरी उचकटून त्यातील रोख २५ हजारांसह सोने आणि चांदीचे ५० हजारांचे दागिने लंपास केले.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -