वीज कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर, भोरमधील महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी फटाके फोडत आनंद साजरा (Celebration) केला. यावेळी पेढे कर्मचाऱ्यांकडून एकमेकांना पेढे भरविण्यात आले. विविध मागण्यांसाठी मागचे दोन दिवस वीज कर्मचारी संपावर होते. मात्र वीज कर्मचाऱ्यांची ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक पार पडल्यानंतर संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली. ऊर्जामंत्र्यांच्या लेखी आश्वसनानंतर हा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांचा हा संप सुरू असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अंधार पसरला (Power Outage) होता. दरम्यान, आता संप मागे घेतला गेल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. कर्मचाऱ्यांचा आनंद यावेळी त्यांनी फटाके फोडून साजरा केला.
मागण्या मान्य
बदली धोरणासंदर्भात घेतलेला एकतर्फी निर्णय मागे घेण्यात यावा, खासगीकरण, नोकरभरती यासह कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत ऊर्जामंत्री सकारात्मक पाहायला मिळाले. याबाबत तातडीने सूचना देऊन बदल करण्यात येईल, असे आश्वसन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले. चर्चा केल्याशिवाय बदली धोरण राबवले जाणार नाही तसेच कंत्राटी कामगारांना सुरक्षा देण्याबाबत चर्चाही या बैठकीत झाली.
वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक सरकारी कार्यलये अंधारात गेली होती. तसेच शेतकरी आणि उद्योगांना आणि परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फटका बसत होता. वीज गेल्याने शतकऱ्यांना शेताला पाणी देणे अवघड होऊन बसले होते. तर वीजेच्या तुटवड्यामुळे अनेक उद्योगधंदेही बंद होत होते. तर परीक्षेत वीज नसल्याने अभ्यासाला विद्यार्थ्यांना अडचण येत होती. मात्र आता सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे.