Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रशिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

सातारा शहरातील राजवाडा येथील गांधी मैदान परिसरात आज वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवपंचायतन महायज्ञ करण्यात आला.त्यानंतर भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत सायंकाळी पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पाच वेळा पुष्पवृष्टी करण्यात आली.

यावेळी भाजप आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नैसर्गिक प्रकोप दूर होण्याबरोबरच सर्व प्रकारच्या रोगांचे निवारण व्हावे व जनकल्याणासाठी हा महायज्ञ सोहळा करण्यात आला. तर सायंकाळी पोवई नाक्यावर शिवतीर्थावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास महाअभिषेकही करण्यात आला.

सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले याचे शिवतीर्थावर कार्यकर्त्यांसह आगमन झाले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला तसेच दुग्धाभिषेकही केला. यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज कि जय असा जयघोष केला. यावेळी सातारा, जावळी मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -