Tuesday, December 24, 2024
Homeमनोरंजनसलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडची धमकी; ‘एके दिवशी तुझाही पर्दाफाश होईल’

सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडची धमकी; ‘एके दिवशी तुझाही पर्दाफाश होईल’

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी त्याचा कोणताही नवीन चित्रपट येत नसून त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अलीने एक धमकी दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सोमी अलीने कोणाचेही नाव न घेता एक पोस्ट लिहिली आहे. सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमीने बॉलिवूडमधील हार्वे विन्स्टीनचा पर्दाफाश करण्याची धमकी दिली. बॉलिवूडच्या हार्वे विन्स्टीनबद्दलच्या या इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिने अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला देखील टॅग केले. सोमी अलीने तिच्या इंस्टाग्रामवर अभिनेता सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’ चित्रपटातील एका दृश्याचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आणि लिहिले, “बॉलिवूडचा हार्वे विन्स्टीन, एक दिवस तुझाही खुलासा होईल.” हार्वे विन्स्टीन हा एक प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट निर्माता आहे. हार्वेवर 80 हून अधिक अभिनेत्री आणि महिलांनी बलात्कार, मारहाण आणि धमकावण्याचे आरोप केले होते.

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये सोमीने असेही म्हटले आहे की, तू ज्या महिलांवर अत्याचार केले आहेस, त्या सर्व समोर येऊन सत्य सांगतील. जसे ऐश्वर्या राय बच्चनने केले. ही पोस्ट शेअर करताना सोमी अलीने ज्या प्रकारे गोष्टी लिहिल्या आहेत, त्यावरून नेटकऱ्यांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला आहे की, सोमीने हे सर्व कोणाच्या बाबतीत लिहिले आहे?

एकेकाळी जेव्हा सोमी आणि सलमान खान रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा सलमानची ऐश्वर्यासोबतची जवळीक वाढली होती. कारण सलमान त्यावेळी ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. त्यानंतर ऐश्वर्यानेही सलमानवर मारहाण आणि फोनवर धमकी दिल्याचा आरोप केला होता. सोमीने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, सलमान माझा पहिला बॉयफ्रेंड होता पण ऐश्वर्यामुळे त्यांचे नाते तुटले.

पाकिस्तानी वंशाची सोमी अली अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये राहत होती. सोमी अलीने सांगितले होते की, ती फक्त सलमानसाठी भारतात आली होती आणि चित्रपटात काम केले होते. जेणेकरून नंतर ती सलमानसोबत लग्न करू शकेल. पण जवळपास 8 वर्षांनी त्यांचे नाते तुटले. 1991 ते 1997 दरम्यान, सोमी अलीने 10 हून अधिक चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केले. सध्या सोमी अली परदेशात एक एनजीओ चालवते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -