Monday, December 23, 2024
Homeबिजनेस‘क्रिप्टोकरन्सी’मध्ये सर्वात मोठी चोरी; हॅकर्सचा कोट्यवधी रुपयांवर डल्ला..!

‘क्रिप्टोकरन्सी’मध्ये सर्वात मोठी चोरी; हॅकर्सचा कोट्यवधी रुपयांवर डल्ला..!

‘क्रिप्टोकरन्सी’.. अर्थात आभासी चलन.. चलनी नोटांना पर्याय म्हणून वापरली जाणारी डिजिटल किंवा व्हर्च्युअल करन्सी.. हे चलन कोणतेही सरकार वा बँक ‘छापत’ नाही. फक्त ऑनलाईन स्वरुपात या चलनात कोट्यवधी रुपयांचा व्यवहार चालतो. त्यामुळेच त्यात सर्वाधिक धोकाही असतो..

‘क्रिप्टोकरन्सी’ हॅक करणं कोणत्याही हॅकर्ससाठी शक्य नसल्याचा दावा आतापर्यंत करण्यात येत होता.. मात्र, हा दावा किती तकलादू होता, हे एका हॅकर्सने दाखवून दिलंय.. कधीही झाली नसेल, इतकी मोठी चोरी हॅकर्सनी केलीय.. त्यामुळे ‘क्रिप्टोकरन्सी’ (cryptocurrency) क्षेत्रात मोठी खळबळ उडालीय..

‘अ‍ॅक्सी इन्फिनीटी’ (Axie Infinity) या लोकप्रिय ऑनलाइन व्हिडिओ गेमशी जोडलेल्या ‘ब्लॉकचेन नेटवर्क’मधून हॅकर्सनी जवळपास 600 मिलियन डॉलर (सुमारे 4,543 कोटी रुपये) चोरले आहेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी क्रिप्टो चोरी मानली जात आहे.

‘रोनिन’ हे ‘अ‍ॅक्सी इन्फिनीटी’चे ‘ब्लॉकचेन नेटवर्क’ आहे. ऑनलाइन व्हिडिओ गेमच्या निर्मात्यांकडील ‘स्काय माविस’ आणि ‘अ‍ॅक्सी डीएओ (DAO) कॅम्प्युटर्सचा हॅकर्सनी वापर केला. ज्यांना ‘नॉड्स’ म्हणतात. हे एक ‘ब्रिज सॉफ्टवेअर’ला सपोर्ट करते, जे लोकांना इतर नेटवर्कवर टोकन वापरण्याची परवानगी देते. या ‘रोनिन ब्रिज’वर हॅकर्सनी हल्ला केला.

हॅकर्सनी 23 मार्च रोजी दोन व्यवहारांत 173,600 ‘इथर’ किमतीचे ‘रोनिन ब्रिज’ व 25.5 मिलियन यूएसडीसी (USDC) टोकन चोरले. मात्र, या चोरीची माहिती मंगळवारी (ता. 29) मिळाली. चोरीच्या वेळी या व्यवहारांचे मूल्य 545 मिलियन डॉलर होते, परंतु चोरी लक्षात आली, त्या दिवशीच्या किमतींवर आधारित, अंदाजे 615 मिलिन डॉलर होते.

दरम्यान, चोरीचा हा प्रकार लक्षात येताच, ‘रोनिन ब्लॉकचेन’वर वापरल्या जाणार्‍या ‘टोकन रॉन’ची किंमत 22 टक्क्यांनी कमी झाली. एएक्सएस (AXS), ‘अ‍ॅक्सी इन्फिनीटी’मध्ये वापरलेले टोकन 11 टक्क्यांनी घसरले. चोरी झालेल्या रकमेचा आढावा घेण्यासाठी प्रमुख ‘क्रिप्टोकरन्सी एक्सचेन्जस्’ आणि ‘ब्लॉकचेन ट्रेसर चैनॅलिसिस’च्या संपर्कात असून, ते ‘लॉ इन्फोर्समेंट’सोबत काम काम करीत असल्याचे ‘रोनिन’ने म्हटलंय..

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -