जागतिक बाजारातील चढउतारामुळे गुरुवारी भारतीय बाजारातही सोने-चांदीच्या दरात घसरण झाली. सोन्याचा दर आज 51 हजारांच्या खाली आला. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी 9.10 वाजता 24-कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत 47 रुपयांनी घसरून 50,906 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. याआधी सोन्याचा भाव 50,906 रुपयांवर उघडून स्थिर राहिला. सोने सध्या विक्रमी
पातळीपेक्षा 4,700 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे. कोरोना महामारीच्या काळात सोन्याचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला होता. 2020 मध्ये, शेअर बाजारातील तीव्र घसरणीमुळे, सोन्याची मागणी वाढली होती आणि त्याचा दर 55,700 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला होता.
चांदीची मोठी घसरण, भाव 67 हजारांच्या खाली गुरुवारी MCX वर चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आणि भाव 67 हजारांच्या खाली आले. सकाळी 9.10 वाजता चांदीचा भाव 537 रुपयांनी घसरून 66,869 रुपये प्रतिकिलो झाला. चांदीही विक्रमी पातळीवरून सुमारे 6 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. एक दिवसापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून आली होती, मात्र आज पुन्हा घसरणीचे वातावरण आहे.