Friday, July 25, 2025
Homeब्रेकिंगBig News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी, NIA च्या मुंबई...

Big News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी, NIA च्या मुंबई आला ईमेल

ताजी बातमी ऑनलाइन टीम

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) मुंबई कार्यालयात एक ईमेल (Email) आला आहे. त्यातून पंतप्रधानांच्या हत्येचा कट आखण्यात आल्याचे उघड झाले आहे. ’20 स्लिपर सेल आणि 20 किलो आरडीएक्स तयार असल्याचे ईमेलमध्ये म्हटले आहे. धक्कादायक म्हणजे पंतप्रधानांच्या हत्येचा कट उघडकीस येऊ नये, म्हणून आपण आत्महत्या करत असल्याचे देखील हा ईमेल पाठवणाऱ्याने म्हटले आहे. या प्रकरणी NIA ने चौकशी सुरू केली आहे. या कटाचा छडा लावण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

नेमके काय म्हणले आहे धमकीच्या ईमेलमध्ये..?
पंतप्रधान मोदींची हत्या करण्यासाठी 20 स्लिपर सेल आणि 20 किलो आरडीएक्स तयार असल्याचे ईमेलमध्ये म्हटले आहे. हल्ल्याची योजना पूर्ण झाली आहे. अनेक दशतवाद्यांची आपले संबंध असल्याचे ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे. क्कादायक म्हणजे पंतप्रधानांच्या हत्येचा कट उघडकीस येऊ नये, म्हणून आपण आत्महत्या करत असल्याचे देखील हा ईमेल पाठवणाऱ्याने म्हटले आहे.

NIA ने हा धमकीचा मेल गुप्तचर विभाग आणि सुरक्षा एजन्सीकडे पाठवण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पंतप्रधानांना ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -