ताजी बातमी ऑनलाइन टीम
गुढीपाडवा (Gudi Padwa) हा चैत्र महिन्यात येणारा एक महत्त्वाचा सण आहे. या सणापासूनन मराठी आणि कोंकणी लोकांच्या नवीन वर्षाला सुरुवात होते. हा सण महाराष्ट्र आणि गोव्यात शुक्ल पक्षाच्या चैत्र प्रतिपदा तिथीला हिंदू कॅलेंडरनुसार साजरा केला जातो. यावेळी गुढी पाडव्याचा सण 2 एप्रिलला (2 April) साजरा केला जाणार आहे. या दिवशी घरात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात. भगवान ब्रह्मा (Bramha) आणि विष्णूची पूजा केली जाते. हिंदू धर्मात असे मानले जाते की चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. विशेषकरुन महाराष्ट्रात हिंदू नववर्ष हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. हा सण देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. कोंकणी लोक याला संवत्सर म्हणतात. कर्नाटकमध्ये हा सण युगाडी पर्व या नावाने ओळखला जातो, तर आंध्रप्रदेश, तेलंगाणामध्ये हा दिवस उगाडी, काश्मीरमध्ये ‘नवरेह’, मणिपूरमध्ये सजिबू नोंगमा पानबा या नावानं ओळखला जातो.
गुढीपाडवा कसा साजरा केला जातो?
महाराष्ट्रात गुढीपाडवा खासकरुन साजरा केला जातो. लोक या दिवशी नवीन कपडे घालतात. हा सण मित्र, कुटुंबातील सदस्यांसह आणि नातेवाईकांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विशेष दिवशी पुरणाची पोळी आणि श्रीखंड बनवले जाते. याशिवाय, गोड भातही बनविला जातो. सूर्योदयाला भगवान ब्रह्माला या सर्व पदार्थांचं नैवेद्य दाखवलं जाते.
गुढीपाडव्याचे महत्त्व
पौराणिक कथांनुसार, प्रतिपदेच्या तिथीला भगवान ब्रह्मा यांनी विश्वाची निर्मिती केली होती. या दिवशी भगवान ब्रह्माची विधीवत पूजा केली जाते. मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि घरात सुख-समृध्दी नांदते.
गुढीपाडव्याची तिथी आणि शुभ मुहूर्त
गुढीपाडव्याचा उत्सव – 2 एप्रिल 2022
प्रतिपदा तिथीची सुरुवात – 2 एप्रिल 2021 ला 06:09am