Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : गडहिंग्लजच्या यात्रेत डर्ट ट्रॅकचा थरार...

कोल्हापूर : गडहिंग्लजच्या यात्रेत डर्ट ट्रॅकचा थरार…

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोरोनाचे निर्बंध संपल्याने यात्रा-जत्रांच्या हंगामाने गती घेतली आहे. गडहिंग्लज उपविभागातील पहिल्या टप्प्यातील यात्रा निर्बंधांमध्येच पार पडल्या. गुढीपाडव्यापासून कोरोनाचे सर्व निर्बंध शासनाने मागे घेतले. त्यामुळे यात्रांच्या निमित्ताने स्पर्धांची रेलचेल पुन्हा एकदा सुरु झाली आहे.


गडहिंग्लज शहरालगतच्या हट्टीबसवाणा यात्रेनिमित्त रविवारी(दि.३) डर्ट ट्रॅक स्पर्धा घेण्यात आली. गावातील टू-व्हीलर मेकॅनिकल आणि यात्रा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत पुणे, मुंबई, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, धारवडसह स्थानिक असे २५ हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. सुमारे दोन वर्षांनी डर्ट ट्रॅकचा थरार अनुभवण्यास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -