Monday, July 28, 2025
Homeमहाराष्ट्र13 दिवसांत पेट्रोल 8 रुपयांनी महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा पेट्रोल...

13 दिवसांत पेट्रोल 8 रुपयांनी महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा पेट्रोल डिझेलचा भाव

ताजी बातमी ऑनलाइन टीम

राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel) किमती सातत्याने वाढत आहेत. 22 मार्चपासून आत्तापर्यंत म्हणजेच 13 दिवसांत पेट्रोल 8 रुपयांनी महागले आहे. भारतीय तेल कंपन्यांनी आज रविवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत (Delhi) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 80 पैशांनी वाढ केली आहे. इंडियन पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) पेट्रोल 118.41 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तसेच आता डिझेल देखील 102.64 रुपये प्रति लिटरच्या पुढे विकले जात आहे. देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर आता 103.41 वर पोहोचला आहे. तर डिझेल 95 रुपयांच्या जवळ आहे. महाराष्ट्रात देखील प्रत्येक जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 3 दिवसांत पेट्रोल 8 रुपयांनी महाग झाले आहे.


महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरात काय आहे आजचा पेट्रोल आणि डिझेल दर

राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल आता 120.96 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 103.51 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. कृपया लक्षात घ्या की, स्थानिक करानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात. देशातील चार महानगरांची तुलना केल्यास मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 118.41 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर वाढून 102.64 रुपये झाला आहे. गेल्या 13 दिवसांत पेट्रोलचे दर 8 रुपयांनी वाढले आहेl. गेल्या 22 मार्चपासून तब्बल १० वेळा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. रविवारी देखील इंधनाच्या दरात लिटरमागे ८५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. देशभरातील जवळपास सर्वच महानगरांमध्ये पेट्रोलच्या किमतीने शंभरचा टप्पा पार केला आहे. गेल्या १३ दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे तब्बल ८ रुपयांची वाढ झाली आहे.

शहर पेट्रोल डिझेल

मुंबई 118 102
ठाणे 117.68 100.48
सातारा 118.63 101.33
सांगली 118.34 101.08
कोल्हापूर 118.51 101.25
लातूर 119.26 101.95
औरंगाबाद 119.78 102.45
नागपूर 118.44 101.18

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -