Thursday, July 24, 2025
Homeमहाराष्ट्रइंदिरा गांधी रुग्णालयात सापडला दुर्मीळ 'मसण्याऊद'

इंदिरा गांधी रुग्णालयात सापडला दुर्मीळ ‘मसण्याऊद’

ताजी बातमी ऑनलाइन टीम

मसण्याऊद हा प्राणी आढळून आल्याने नागपुरच्या इंदिरा गांधी रुग्णालय परिसरात खळबळ उडाली. हा प्राणी गोरेवाडा जंगलातून तो आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मसन्याउदाला पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.


इंदिरा गांधी रुग्णालयाचा परिसरात मसण्याऊद प्राणी आढळून आल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली. वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीच्या सदस्यांना कळविण्यात आलं. त्यांनी वनविभागाच्या सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरशी संपर्क साधला. ट्रान्झिटचे पथक घटनास्थळी पोहचले.

पथकातील कर्मचारी मसण्याऊदच्या शोधात लागले. अथक प्रयत्नानंतर कर्मचाऱ्यांना रात्री मसण्याऊद सापडला. वाइल्ड लाईफ वेलफेअरच्या वन्यजीव प्रेमींनी मसन्याऊदाला पकडण्यात मदत केली. त्यानंतर त्याला वनविभागाच्या हवाली करण्यात आले. शव उकरून खाणाऱ्या जमातीमध्ये या मसण्याऊदचा समावेश होतो. गोरेवाडा जंगलातून शहरात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मसण्याऊदची प्रकृती उत्तम आहे. त्याला लवकरच जंगलात सोडण्यात येणार आहे. या प्राण्याला सध्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -