ताजी बातमी ऑनलाईन टीम
टॉलिवूडमधून (Tollywood) बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करणाऱ्या दिव्या भारतीचा (Divya Bharti) पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला होता. बॉलिवूडमधील मोजक्याच अभिनेत्रींमध्ये दिव्या भारतीचा (Actress Divya Bharti) समावेश होतो, ज्या कमी वयात एवढं नाव कमवतात. दिव्याने आजच्याच दिवशी म्हणजे 5 एप्रिल 1993 रोजी जगाचा निरोप घेतला होता. ती आज हयात नसली तरी आजही ती प्रेक्षकांच्या हृदयात जिवंत आहे. दिव्या भारतीच्या मृत्यूचं रहस्य आजही कायम आहे. त्यानुसार जाणून घेऊया दिव्या भारतीचा मृत्यू झाला त्या रात्री नेमकं काय झालं होत.
दिव्या भारतीचा जन्म 25 फेब्रुवारी 1974 रोजी झाला होता. वयाच्या 18 व्या वर्षीच तिने चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला सोबत लग्न केले. मात्र लग्नाच्या एका वर्षानंतर दिव्याचा रहस्यमायी मृत्यू झाला. दिव्याच्या मृत्यूनंतर मोठी खळबळ उडली होती. या प्रकरणी साजिद नाडियाडवाला यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामागचं कारण देखील तसेच होते.
मीडिया रिपोर्टनुसार, दिवा भारतीचा मृत्यू झाला, त्या दिवशी मुंबईतील तुलसी अपार्टमेंटमधील दिव्याच्या घरी रात्री 10 वाजता फॅशन डिझायनर नीता लुल्ला आणि दिव्याचे पती पोहचले. याठिकाणी 10 वाजेनंतर तिघांनी मद्यप्राशन केले. दरम्यान, अचानक हात सटकून दिव्या खिडकीतून खाली पाडली आणि तिचा मृत्यू झाला. दिव्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हणत या घटनेनंतर खळबळ उडाली होती.