Tuesday, December 16, 2025
Homeब्रेकिंगखुशखबर ! विद्यार्थ्यांना मिळणार नवा कोरा ‘डिझाईनर गणवेश’

खुशखबर ! विद्यार्थ्यांना मिळणार नवा कोरा ‘डिझाईनर गणवेश’

ताजी बातमी ऑनलाइन टीम

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण (Education) आणि उत्तम सुविधा देण्यासाठी पालिका सतत काहीना काही उपाययोजना, उपक्रम राबवत असते. आता पालिका एका नव्या उपक्रमासह आली आहे. विद्यार्थ्यांना (Students) नव्या शैक्षणिक वर्षात नवा कोरा आकर्षक आणि चक्क डिझाईन केलेला गणवेश (Designer School Uniform) मिळणार आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पालिकेकडून २७ शालेय वस्तू मोफत देण्यात आलेल्या आहेत. आता विद्यार्थ्यांना गणवेशदेखील देण्यात येणार आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी पालिकेकडून समितीची स्थापना करण्यात आली आहे. पालिका अधिकारी, शिक्षक, ड्रेस डिझायनरचा यात समावेश आहे. लवकरच ही समिती नव्या रंगसंगतीचा गणवेश सुचवणार असल्याची माहिती शिक्षण सहआयुक्त अजित कुंभार यांनी दिलीये.



विद्यार्थ्यांना हा गणवेश मोफत
समितीने गणवेशाचे चार सॅम्पल निवडले आहेत यातील एका सॅम्पलवर शिक्कामोर्तब करण्यात येईल. विद्यार्थ्यांना हा गणवेश मोफत दिला जाणार आहे. पुढच्या आठवडाभरात यासंदर्भात अंतिम निर्णय होणार असल्याचं पालिका प्रशासनानं सांगितलंय.



गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून शाळांबद्दलची माहिती देण्यात येणार
पालिका शाळेत देण्यात येणाऱ्या सुविधा, दर्जेदार शिक्षण यामुळे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हीच पटसंख्या आणखी वाढावी या उद्देशाने गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून शाळांबद्दलची माहिती देण्यात येणार आहे. हे गुणवंत विद्यार्थी शाळेत मिळणारे शिक्षण, सुविधा, संधी, सर्वांगीण विकासासाठी मिळणारी संधी याबाबतची माहिती देणार आहेत.



विद्यार्थ्यांची संख्या वाढली
सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार असल्याचं अजित कुंभार यांनी सांगितलंय. दोन वर्षात पालिकेतील विद्यार्थ्यांची संख्या २६ हजारांनी वाढली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -