Saturday, January 31, 2026
Homeमहाराष्ट्रपहिल्या दिवशी कोल्हापूरचे वर्चस्व

पहिल्या दिवशी कोल्हापूरचे वर्चस्व

सातार्‍यातील जिल्हा क्रीडा संकुलात महाराष्ट्र केसरीचा मंगळवारी सायंकाळपासून थरार सुरू झाला. अनेक रोमांचक लढतींमुळे पहिल्याच दिवशी रंगत भरली. कुस्तीची पंढरी असणार्‍या कोल्हापूरच्या पैलवानांनी पहिल्याच दिवशी वर्चस्व राखले. रात्री 9 वाजेपर्यंत सुमारे 150 हून अधिक लढती झाल्या. यामध्ये सातार्‍याच्या पैलवानांनीही चमकदार कामगिरी करत पुढील फेरीत प्रवेश मिळवला.

राजस्थान पराभवानंतरही पहिल्या स्थानी

जिल्हा क्रीडा संकुलात मंगळवारी 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सायंकाळी पाचनंतर शुभारंभ झाला. पहिल्या दिवशी 57 किलो वजन गटात एकूण 37 लढती झाल्या. यामध्ये आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सोलापूरचा पै. सौरभ इगवे, सुवर्णपदक विजेता बीडचा पै. अतिष तोडकर यांनी चमकदार कामगिरी केल्याने ते अंतिम लढतीसाठी दावेदार झाले आहेत. तर माती विभागात दोन फेर्‍या पूर्ण झाल्या. त्यामध्ये सातार्‍याचा तेजस गोमणे, कोल्हापूरचा अक्षय डेरे, सोलापूरचा जोतिबा अटकळे, कोल्हापूरचा विनायक चव्हाण यांनीही चांगली कामगिरी करत पुढची फेरी गाठली.

70 किलो वजन गटात गादीमध्ये तिसर्‍या फेरी अखेर कोल्हापूरचा शुभम पाटील, सोनबा गोंगणे, सिंधूदुर्गचा कल्पेश तळेकर, जालन्याचा हर्षद शेख यांनी विजय मिळवत आगेकूच केली आहे. तर या वजनगटात मातीमध्ये चार लढती झाल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -