Friday, July 25, 2025
Homeराजकीय घडामोडी42 वर्षांचा झाला भाजपा, पंतप्रधान मोदी संबोधीत करणार, महाराष्ट्रासह देशभर पहिल्यांदाच शोभायात्रा

42 वर्षांचा झाला भाजपा, पंतप्रधान मोदी संबोधीत करणार, महाराष्ट्रासह देशभर पहिल्यांदाच शोभायात्रा

भारतीय जनता पार्टी (BJP) म्हणजेच भाजपचा आज 42 वा स्थापना दिवस. (BJP Foundation Day) एका अर्थानं देशातल्याच नाही तर जगातल्या सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या राजकीय पक्षाचा वाढदिवस. आजच्याच दिवशी म्हणजे 6 एप्रिल 1980 ला भाजपाची स्थापना झालेली होती. सुरुवातीला जनसंघ म्हणून ओळख असलेला पक्ष नंतर भारतीय जनता पक्ष नावानं उदयाला आला. 1984 ला लोकसभेत अवघे दोन खासदार असलेला भाजपा आज दणदणीत बहुमत घेत सत्तेत आहे. तो फक्त सत्तेतच आहे असं नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखाली, विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष गलितगात्र झालेला दिसतोय. गेल्या 42 वर्षांचा भारतीय जनता पार्टीचा इतिहास म्हणूनच महत्वपूर्ण ठरतोय. त्याचाच ऊहापोह आजच्या दिवशी केला जातोय.

इचलकरंजी : ८६ लाखांची लूट करणार्‍या तिघांना अटक

भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस असेल आणि त्यादिवशी पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांना संबोधीत करणार नाहीत असं कसं होईल. बरं प्रत्येक कार्यक्रमात भाजपचा कार्यकर्ता किती महत्वाचा आहे हे ते आवर्जून सांगत असतात. त्यामुळेच आज सकाळी 10 वा. पंतप्रधान मोदी हे भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधीत करतील. भाजपची आतापर्यंतची वाटचाल आणि भविष्यातल्या वाटचालीवर ते बोलतील अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. फक्त मोदींचं संबोधनच नाही तर भाजपानं आज महाराष्ट्रासह देशपातळीवर ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजीत केलाय. तोही जिल्हा, विभाग, गाव पातळीपर्यंत ध्वजारोहण केलं जाणार आहे. पक्षाच्या स्थापना दिनी तो तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे.

महाराष्ट्रात गुढीपाडव्याला शोभायात्रेची परंपरा आहे. हीच परंपरा भाजपानं स्थापनादिनी देशभरात पक्षासाठी राबवण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजेच भाजपच्या 42 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच शोभायात्रा निघणार आहे. ह्या शोभायात्रेत भाजपच्या टॉपच्या नेत्यांपासून ते गावपातळीवरच्या सामान्य नेत्यापर्यंत सर्वांनी सहभागी होणे अपेक्षीत आहे. तशा सुचना देण्यात आल्यात. त्यामुळेच ध्वजारोहणाबरोबरच शोभायात्रा यासुद्धा आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -