Tuesday, December 24, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : हायप्रोफाईल वेश्‍या व्यवसायप्रकरणी चौघांना सक्‍तमजुरी

कोल्हापूर : हायप्रोफाईल वेश्‍या व्यवसायप्रकरणी चौघांना सक्‍तमजुरी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मुलींच्‍या गरिबीचा फायदा घेवून त्‍यांना वेश्‍या व्यवसायात आणणार्‍या तसेच एका मुलीची विक्री करणार्‍या टोळीला न्‍यायालयाने सक्‍तमजुरीची शिक्षा सुनावली. पुण्‍यात डीजे ऑपरेटींगचा कोर्स शिकणाऱ्या नेपाळी मुलीची या टोळीतील महिलांनी विक्री केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. दुसरी मुलगी वडिलांच्‍या आजारपणामुळे यामध्‍ये ओढली गेल्‍याचे कारण पुढे आले आहे.



जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश एस. आर. पाटील यांच्‍यासमोर झालेल्‍या सुनावणीत आरोपी सरीता रणजीत पाटील (वय ४१, रा. पाचगाव, करवीर), विवेक शंकर दिंडे (३१, रा. राजारामपुरी), मनिषा प्रकाश कट्टे (३०, रा. भोसलेवाडी, कोल्‍हापूर) या तिघांना १० वर्षे सक्‍तमजुरी व २९ हजार रुपये दंड ठोठावला. वैभव सतिश तावसकर (२८, रा. पांगरी, सोलापूर) याला दोन वर्षे सक्‍तमजुरी व ४ हजारांचा दंड सुनावण्‍यात आला.



आरोपी सरीता पाटील ही कळंबा येथील एका अपार्टमेंटमधील फ्‍लॅटमध्‍ये कुंटणखाना चालवत होती. विवेक दिंडे व वैभव तावसकर हे गरजू व असहाय्य महिलांना वेश्‍या व्‍यवसायासाठी सरीता पाटील हिच्‍याकडे घेवून येत होते. २०१९ मध्‍ये करवीर पोलिसांनी कळंबा येथील या कुंटणखान्‍यावर छापा टाकून पीडित मुलीची सुटका केली होती. करवीर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल होवून याची सुनावणी जिल्हा व सत्र न्‍यायालयात चालली.

नेपाळी मुलीची विक्री….
पोलिसांनी सुटका केलेल्‍या पीडित मुलींपैकी एक मुलगी नेपाळची आहे. ती पुण्यामध्ये डीजे ऑपरेटरचे शिक्षण घेत होती. तिची मोठी बहीण कोल्हापूरमध्‍ये राहण्‍यास होती. २०१९ मध्‍ये फ्रेन्‍डशिप डे निमित्त आयोजित एका पार्टीसाठी ती कोल्हापुरात आली होती. ती मेकअपसाठी ताराबाई पार्कातील पार्लरमध्‍ये गेली असता आरोपी मनिषा कट्टे हिने ‘तु दिसायला छान आहेस, तुला जॉबपेक्षा जास्त पैसे मिळतील’ असे आमिष दाखवले. तिला पाचगाव येथील बंगल्‍यात नेवून आरोपी सरिताची ओळख करून दिली. त्यानंतर पीडित मुलीला जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्यास भाग पाडले. तसेच मनिषाने तिची सरीता पाटील हिला विक्री केल्‍याचेही समोर आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -