ताजी बातमी ऑनलाइन टीम
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबईची धावसंख्या ६ षटकात १ बाद ३५ आहे.
कर्णधार श्रेयसने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. टीम साऊदीच्या जागी पॅट कमिन्स आणि शिवम मावीच्या जागी रसिक सलाम याला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर मुंबईच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. अनमोलप्रीत सिंगच्या जागी सूर्यकुमार यादव आणि टीम डेव्हिडच्या जागी डेवाल्ड ब्रेविसचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.
मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशनने डावाची सलामी दिली. पहिल्याच षटकात कोलकात्याच्या उमेश यादवने रोहितला त्याच्या स्विंग आणि वेगानं खूप त्रास दिला. एका षटकानंतर मुंबईची धावसंख्या एकही विकेट न गमावता एक धाव होती. डावाच्या तिसऱ्या षटकात उमेश यादवने मुंबई इंडियन्सला पहिला धक्का दिला. त्याने कर्णधार रोहित शर्माला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रोहितला १२ चेंडूत तीन धावा करता आल्या.
कोलकाता नाइट रायडर्स :
अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिक सलाम, वरुण चक्रवर्ती
मुंबई इंडियन्स :
इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, डेवाल्ड ब्रेविस, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.