Friday, March 14, 2025
Homeब्रेकिंगपेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी, कोणतीही वाढ न झाल्याने मिळाला दिलासा!

पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी, कोणतीही वाढ न झाल्याने मिळाला दिलासा!

वाढत्या महागाईमध्ये (Inflation) सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहेत. त्यात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे (Petrol-Diesel Price) सत्र सुरु आहे. सततच्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागत आहे. अशामध्ये आज सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण आज पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. भारतीय तेल कंपन्यांनी (Petroleum companies) जारी केलेल्या नव्या दरानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर आज स्थिर आहेत त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. पेट्रोल -डिझेलच्या दरामध्ये सतत होणाऱ्या वाढीमुळे (Petrol -Diesel Price Hike) आता अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरीपार केली आहे.

उत्तर प्रदेश, पंजाब, गोव्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर देशामध्ये पेट्रोल-डिझेल दरवाढीचे सत्र सुरु झाले आहे. 17 दिवसांपैकी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये 14 दिवस वाढ झाली आहे. 22 मार्च ते आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये 10 रुपयांनी वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी आज जारी केलेल्या नव्या दरानुसार, मुंबईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत (Mumbai Petrol Price) 120.51 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत (Mumbai Diesel Price) 104.77 रुपये झाली आहे. तर दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर (Delhi Petrol Price) 105.41 रुपये आणि डिझेलचा दर (Delhi Diesel Price) 96.67 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

देशामध्ये 22 मार्चपासून पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर फक्त एक दिवस वगळता इतर सर्व दिवस दरवाढीचे सत्र सुरुच आहे. 7 एप्रिलपर्यंत म्हणजे या 17 दिवसांच्या काळामध्ये पेट्रोल-डिझेल 10 रुपये प्रति लिटरने महागले आहे. सर्वात जास्त महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामध्ये मिळत आहे. स्थानिक करामुळे महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचा दर 1.50 रुपयांनी वाढून 123.53 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -