बॉलिवूडचं मोस्ट चार्मिंग कपल अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट अखेर विवाहबंधनात अडकणार आहे. या लग्नाबाबतीच माहिती आता माध्यमांसमोर येण्यास सुरुवात झाली आहे. रनबीर आणि आलियाने हा विवाह सोहळा अगदी सध्या पद्धतीने करायचा ठरवले आहे. चाहत्यांच्या आणि मीडियाच्या नजरेपासून दूर मुंबईतील आरके स्टुडिओमध्ये या दोघांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार 13 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान मुंबईमध्ये या लग्नाचे सर्व विधी पार पडतील. त्या दृष्टीने जोरदार तयारीला देखील सुरुवात झाली आहे. आलिया भट्ट-रणबीर कपूर यांच्या लग्नात कोण कोण पाहुणे मंडळी असणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे आणि आता या पाहुणे मंडळींची नावं देखील समोर येण्यास सुरुवात झाली आहे. जाणून घेऊया या विवाहसोहळ्याविषयीची संपूर्ण माहिती.
रणबीर आणि आलिया यांचे लग्न स्टार्स अफेयर असेल आणि यामध्ये इंडस्ट्रीतील अनेक मोठे स्टार्स सहभागी होणार आहेत. वेडिंग गेस्टच्या लिस्टमध्ये संजय लीला भन्साळी, वरुण धवन, अयान मुखर्जी, जोया अख्तर, अर्जुन कपूर आणि मसाबा गुप्ता या काही नावांचा समावेश आहे. शाहरुख खानला देखील रणबीर-आलियाच्या लग्नासाठी आमंत्रित केले असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच करण जौहर, मनीष मल्होत्रा, अनुष्का रंजन, आकांक्षा रंजन, करीना कपूर खान, सैफ अली खान, करिश्मा कपूर हे स्टार्स देखील या लग्न सोहळ्यात उपस्थिती राहणार आहेत. फंक्शन दरम्यान भट्ट आणि कपूर कुटुंबीयांनी या सर्वांना आमंत्रण पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लग्नाच्या सर्व विधींचे आलियाचे सर्व ड्रेसेस प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि सब्यसाजी मुखर्जी हे डिझाईन करणार आहेत. तर रणबीर कपूरने ही जबाबदारी डिझायनर समिधा वांगनू यांच्याकडे सोपवली आहे.