Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगपेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार नाहीत..? मोदी सरकारचा ‘मास्टर प्लॅन’ तयार..!

पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार नाहीत..? मोदी सरकारचा ‘मास्टर प्लॅन’ तयार..!

गेल्या 15 दिवसांत भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात 10 रुपयांनी वाढ झालीय.. एलपीजी सिलिंडरचेही दर वाढवण्यात आले. त्यामुळे महागाई सर्वोच्च पातळीवर पोचलीय.. रोजच्या इंधन दरवाढीमुळं सर्वसामान्य नागरिकाचं जगणं मुश्किल झालंय.. मोदी सरकारला देशातील जनतेच्या नाराजीला सामोरं जावं लागत आहे..

पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ झाल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही वाढल्या आहेत. वाहनाच्या ‘सीएनजी’ गॅसच्या किंमतीही या महिन्यात कित्येक पटींनी वाढल्या. या दरवाढीतून गुरुवारी (ता. 7) काहीसा दिलासा मिळाला. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतींत वाढ केली नाही.

देशात 22 मार्चपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सातत्यानं वाढच होतेय.. गेल्या 17 दिवसांत दरवाढ न होण्याची गुरुवारची केवळ तिसरी वेळ होती. मात्र, आता मोदी सरकार सामान्य नागरिकांना दिलासा देणार आहे. इंधनाची दरवाढ रोखण्यासाठी मोदी सरकारने ‘मास्टर प्लॅन’ आखल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समजली..

महागाई रोखण्यासाठी मोदी सरकार मोठे पाऊल उचलणार आहे.. इंधन दरवाढीपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं देशातील प्रमुख तेल कंपन्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस तरी पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार नसल्याचे समजते..

कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यास..
समजा, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती कमी झाल्या नाहीत किंवा त्यात आणखी वाढ झाली, तरी पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत. अशा वेळी मोदी सरकारने पेट्रोल-डिझेल खरेदीवरील ‘एक्साईज ड्युटी’मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलाय.. शिवाय, पेट्रोल-डिझेल व्हॅटमध्ये कपात करण्याचे निर्देश केंद्रानं सर्व राज्यांनाही दिले आहेत.

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाचा जगाच्या बाजारपेठेवर परिणाम झालाय.. अनेक देशांनी रशियावर निर्बंध घातले असून, अशा काळात रशियाने भारताला स्वस्त दरात कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याची ऑफर दिलीय. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी रशियाची ही ऑफर स्वीकारल्याचे सांगितले आहे..

सध्या भारताला गरजेच्या 85 टक्के तेल आयात करावे लागते. नागरिकांना स्वस्तात इंधन पुरवठा करण्यासाठी भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणार आहे. त्यामुळे आगामी काळात स्वस्त तेलासह कंपन्यांचा नफाही सुधारेल. शिवाय मोदी सरकार उत्पादन शुल्कातही सवलत देऊ शकते. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात..

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -