Sunday, December 22, 2024
Homeआरोग्यविषयकमधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी गंभीर; पायाला जखमा होत असतील तर काळजी घ्या

मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी गंभीर; पायाला जखमा होत असतील तर काळजी घ्या

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या पायांना होणाऱ्या व्रण   म्हणजे जखमा या त्यांच्यासाठी डोकेदुखी असते. रक्तातील साखरेची समस्या वाढल्यामुळे  ही समस्या दीर्घकाळापर्यंत मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना त्रासदायक ठरणारी असते. सहसा हे व्रण अंगठ्याखाली आणि बोटांच्या खाली होत असतात. मधुमहे असणाऱ्या व्यक्तीला व्रणाची त्रास सुरु झाला तर त्वचेखाली असणाऱ्या पेशींचा (Cells) संबंध तुटतो, आणि त्याकाली एक प्रकारचा थर दिसू लागतो. त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या हाडावरही होत असतो.

मधुमेह या आजाराचे तुम्ही जर रुग्ण असाल तर तुमच्या पायाला कधीही जखमा होऊ देऊ नका आणि कदाचित जखमा झाल्याच तर निष्काळजीपणा बाळगू नका. जखमा झाल्यानंतर ताबडतोब तज्ञांचा सल्ला घ्या अन्यथा ते गंभीर स्वरूप घेऊ शकतात आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून तुम्हाला त्रासदायक ठरु शकतात.

पायाला असणाऱ्या अल्सरची कारणे
मधुमेह असणाऱ्या पायाच्या अल्सरचे मुख्य कारण म्हणजे रक्तातील साखरेची पातळी प्रमाणाच्या बाहेर वाढणे. शुगर लेव्हल वाढल्यामुळे काही वेळा पायात आणि शरीराच्या इतर भागात लहान जखमा होतात. त्यावर वेळेत उपचार केले नाही तर गंभीर रुप धारण करु शकतात. त्यामुळे कधीकधी शस्त्रक्रियादेखील होऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल आणि त्यांचे वजन जास्त असेल आणि व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर त्याच्यासाठी डायबेटिक फूट अल्सरचा धोका कायम असतो.

काय असतात लक्षणे
पायांमध्ये असामान्य सूज, जळजळ, लालसरपणा आणि दुर्गंधी, पाय पाणचट, त्वचेचा रंग बदलणे, पाय सुन्न होणे आणि मुंग्या येणे, चालताना वेदना होणे, फोड येणे अशी लक्षणे दिसू लागतात. अनेक वेळा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, फक्त त्वचेचा रंग बदलतो किंवा वेदना जाणवतात. या परिस्थितीतही तुम्ही ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

कोणते उपचार घ्यायचे
डायबेटिक फूट अल्सरचे तज्ज्ञ रोगाच्या स्थितीनुसार निर्णय घेतात. सुरुवातीच्या टप्प्यात, औषधांद्वारे उपचार केले जाऊ शकतात. पण परिस्थिती गंभीर असेल तर शस्त्रक्रियाही करावी लागते. स्थिती गंभीर होण्यापासून रोखण्यासाठी, मधुमेहावर नियंत्रण ठेवणे आणि जखमेचे संक्रमण होण्यापासून संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे.

उपाय कोणते कराल
पाय नियमितपणे स्वच्छ करा.
– बोटांची नखे नियमितपणे कापा.
साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या.
पायाचे तळवे कोरडे ठेवा.
शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता भासू देऊ नका. रोज सकाळी 9 वाजेपर्यंत सूर्यप्रकाश घ्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -