सध्या संपूर्ण जिल्हाभर महावितरण कार्यालयाकडून पूर्वसूचना न देता अघोषित भारनियमन सुरू आहे. त्यामुळे जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत महावितरण कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांना फोन केला असता ते फोन उचलत नाही. त्यामुळे संतप्त झालेले नगरसेवक मनोज कोतकर यांनी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांना जाब विचारत आज (शुक्रवार) कार्यालयाची तोडफोड केली.
महावितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी आपले संपर्क क्रमांक बदलले आहेत. त्यातच अघोषित भारनियमनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे नागरिक व लोकप्रतिनिधी यांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन लागत नाही. त्यामुळे नागरिक व लोकप्रतिनिधी संतप्त झाले आहेत.
महावितरण विभागाकडून कुठलीही पूर्वसूचना न देता रात्री-अपरात्री विद्युत पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र उष्णतेच्या त्रासामुळे जागे राहून काढावी लागते. नागरिक त्रस्त झाल्याने त्यांनी लोकप्रतिनिधींशी संपर्क केला. परंतु, लोकप्रतिनिधींचा फोन महावितरणचे अधिकारी घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे केडगाव येथील त्रस्त झालेले भाजप नगरसेवक मनोज कोतकर यांनी थेट केडगाव येथील महावितरण कार्यालय गाठून तोडफोड केली
पूर्वसूचना न देता अघोषित भारनियमन, भाजप नगरसेवकाची महावितरण कार्यालयात तोडफोड
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -