Sunday, December 22, 2024
Homeसांगलीमहागाईमुळे केंद्र सरकारच्या विरोधात ब्ल्यू पॅंथरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

महागाईमुळे केंद्र सरकारच्या विरोधात ब्ल्यू पॅंथरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

मिरज/ प्रतिनिधी
केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल घरगुती गॅस व इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढीच्या निषेधार्थ निदर्शने व धरणे आंदोलन केले.भारतीय ब्ल्यू पँथर च्या वतीने केंद्र सरकारने पेट्रोल,डिझेल,घरगुती गॅस आणि इतर जीवनावश्यक इतर गरजू वस्तुचे भाववाढ चौपाटीने वाढवून सर्व सामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे.गेले दोन वर्षे कोरोनाच्या महामारीने माणूस जगायचं की मरायच या विचाराने घुसमट ला होता.

कोरोनाचा संपत येत असताना जनतेला पुन्हा प्रश्न पडला की केंद्र सरकारने महागाईमुळे सर्व सामान्य माणसांचे व इतर हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेच अतोनात हाल होताना दिसत आहे आणि म्हणून  भारतीय ब्ल्यू पँथर च्या वतीने केंद्र सरकारने गगनाला भिडलेल्या महागाई च विचार करून पेट्रोल,डिझेल,घरगुती गॅस व इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढ लवकरात लवकर कमी करावे व कमी केलेले दर कायम स्थिर ठेवावे.अन्यथा भारतीय ब्ल्यू पँथर च्या वतीने येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.यावेळी नितीन गोंधळे,धनंजय खांडेकर,चंद्रकांत बापू कोलप,सुर्यवंशी,नितीन म्हेत्रे,महादेव नाईक कुमार कांबळे,हनुमंत शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -